यावल । प्रतिनिधी बशिर तडवी
तालुक्यातील निंबादेवी धरणात बुडालेल्या जळगाव येथील रामेश्वर कॉलनीतील तरुणाचा मृतदेह शोध मोहिमेत पोलिसांना तिसऱ्या दिवशी मिळाला.
रविवारचा सुटीचा दिवस असल्याने जळगाव येथील रामेश्वर कॉलनी भागातील ८ तरुण मित्र यावल तालुक्यातील सावखेडासिम जवळील निंबादेवी धरणात पोहण्यासाठी आले होते. त्यातील जतीन अतुल वार्डे हा १८ वर्षीय तरुण पोहत असताना खोल पाण्यात बुडून बेपत्ता झाल्याची घटना रविवारी + सायंकाळी घडली होती. याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले होते. मात्र, अंधार पडल्याने पोलिसांनी आपली शोध मोहिम थांबवली होती. रविवारी जळगाव येथून दुपारी ३ वाजता
निघालेले सर्व तरूण सायंकाळी ४.३० वाजता धरणावर पोहचले व ५ वाजेच्या सुमारास यातील काही तरूण धरणाच्या पाण्यात आंघोळीसाठी उतरले. मात्र, यात जतीन वार्डे हा पोहत असताना अचानक खोल पाण्यात गेला आणि बुडाला. सोबतच्या तरुणांनी त्याला वाचण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुणालाच पोहता येत नसल्याने खोल पाण्यात कोणी जावू शकले नाही.
बुडालेल्या तरुणाचा शोध यावल पोलिसांनी पट्टीच्या पोहणाऱ्या नागरिकांकडून घेतला असता बुडालेल्या तरुणास शोधण्यात यश मिळाले नाही. दरम्यान, मारुळ व लोसनबर्डी येथील पट्टीच्या पोहणाऱ्यांना अखेर तिसऱ्या दिवशी तरुणास धरणात शोध घेण्यात यश आले. यावलच्या ग्रामीण रुग्णालयात डॉ. प्रशांत जावळे यांच्याकडून मयत तरुणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट