बशीर तडवी
विवरे बु. ग्रामपंचायत कडून वृक्षारोपण संपन्न.
आज दिनांक 1 जुलै रोजी कृषी दिनानिमित्त विवरे बु. ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेच्या आवारात सरपंच श्री इनुस तडवी व ग्रामपंचायत अधिकारी श्री मजीत तडवी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विविध झाडे व फळ झाडे लावण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मिनाक्षी पाटील, उपशिक्षक अविनाश बागुल, तुषार राणे, सम्राट निकम, निलिमा गावीत, प्रतिभा नरवाडे, तसेच गणेश सपकाळ ग्रामपंचायत लिपीक सुरज नरवाडे, राहुल पाटील सफाई कर्मचारी मुकेश हंसकर, शुभम घाडगे व ग्रामस्थ उपस्थित होते.
ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट