यावल तालुका प्रतिनिधी,
बशिर तडवी,
राष्ट्रवादी युवक काँग्रेस रावेर तथा अक्षय सोनवणे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस रावेर च्या वतीने, कार्यकारी अभियंता महावितरण विभाग सावदा यांना, स्मार्ट मिटर विरोधात निवेदन देण्यात आले लवकरात लवकर स्मार्ट मिटर लावणे थांबवावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,*
गेल्या काही दिवसांन पासून नागरिकांची कुठलीही पूर्व परवानगी न घेता किंवा कुठलीही सूचना न देता, स्मार्ट मिटर लावण्याची जीं मोहीम चाललेली आहे तरी स्मार्ट मिटरचे बिल सामान्य जनतेला परवडणारे नाही मागील बिला पेक्षा तीन ते चार पटीने जास्त बिल स्मार्ट मिटरचे येत आहे, महावितरण विभागाला तक्रारी देऊन सुद्धा कुठलेहि सुधारणा झालेली नाही हे स्मार्ट मिटर ज्यांना बसविले असतील त्या मीटरची चौकशी करून बिल देण्यात यावे व आधी दिलेले जास्तीचे बिल कमी किंवा रद्द करण्यात यावे व स्मार्ट मीटर लावणे थांबवण्यात यावे, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे महावीतरण विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अश्या स्वरूपाचे निवेदन दिले…त्यावेळी उपस्थित
अक्षय राजेंद्र सोनवणे, दुर्गेश कुंड, चेतन महाजन, मोंटू पचेरवालं, तेजस बावस्कर,मयूर कवडकर, निखिल सोनवणे, व सर्वं उपस्थित होते
ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट