सजीव देखावे, मिरवणुकीतून आदिवासी संस्कृतीचा परिच
प्रकल्प एकात्मिक आदिवासी कार्यालयाच्या माध्यमातून विविध योजना राबवून शासनाने आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावले आहे. समाजातील प्रत्येक घटकाने शिक्षणाची कास घरावी. कारण, प्रगतीचा खरा मार्ग शिक्षणातून जातो, असे आमदार अमोल जावळे यांनी सांगितले. यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला लोकनायक तंट्या भिल यांच्या वंशजांची उपस्थिती आणि सजीव देखाव्यांसह निघालेल्या मिरवणुका लक्ष्यवेधी ठरल्या.
या कार्यक्रमापूर्वी शहरातील आदिवासी तडवी कॉलनी, मनुदेवी मंदिरापासून सजीव देखाव्यांसह मिरवणूक काढण्यात आली. समारोप प्रकल्प कार्यालयात झाला. येथे रावेरचे आमदार अमोल जावळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. यावेळी
प्रगतीचा खरा मार्ग शिक्षणातून जातो :
यावल येथील आदिवासी गौरवदिन कार्यक्रमाला उपस्थित आमदार अमोल जावळे, महाराष्ट्र ऑल इंडिया काँग्रेस सरचिटणीस धनंजय दादा चौधरी, प्रभाकर सोनवणे यांच्यासह क्रांतीवीर तंट्यामामा भिल यांचे वंशज.
कोंडी टाळण्यासाठी बंदोबस्त
शहरातील अंकलेश्वर बऱ्हाणपूर मार्गावरून मिरवणुका निघाल्या. याचा रहदारीला अडथळा नको म्हणून डीवायएसपी अण्णासाहेब घोलप, पोलिस निरीक्षक रंगनाथ घारबळे, एपीआय अजय वाढवे, उपनिरीक्षक अनिल महाजन, एम. जे. शेख , अमित तडवी, व सर्व पोलीस स्टॉप यांनी बंदोबस्त ठेवला.
नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या आदिवासी दिन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले.
यावलमधील कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी, महानगरपालिका शिक्षण अधिकारी मुंबई राजू अमीर तडवी , एकता मंच अध्यक्ष एमबी सर तडवी, उत्सव समिती अध्यक्ष सदस्य, आसेम परीवार सर्व अध्यक्ष सदस्य,माजी जि.प. सदस्य प्रभाकर सोनवणे, आदिवासी सेलचे जळगाव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष संजय जमादार , आदिवासी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष उस्मान रमजान, आदिवासी सेलचे यावल ता काँग्रेस अध्यक्ष बशीर तडवी, ग्रामविकास अधिकारी मजीत आप्पा परसाडे, ग्रामविकास अधिकारी रजिया तडवी वड्री ,रहिमान पोलीस मुंबई हल्ली मुक्काम नायगाव,आसेम परीवार जिल्हा अध्यक्ष राजू सर, आदिवासी सेल रावेर तालुका काँग्रेस अध्यक्ष ता कामिल नामदार , भरत बारेला सामाजिक कार्यकर्ता , अलाउद्दीन परसाडे, कमाल कान्हा यावल ता काँग्रेस उपाध्यक्ष ,मीना तडवी सरपंच परसाडे, व सर्व सरपंच ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी उपस्थित होते सर्व संघटनेचे अधिकारी उपस्थित होते यावल, व सर्व आदिवासी सातपुड्यातून आलेले आदिवासी तडवी भिल्ल पावरा सर्व आदिवासी बांधव यावल आदिवासी प्रकल्प कार्यालय समोर आदिवासी संस्कृती करण्यात आले प्रांताधिकारी बबन काकडे, तहसीलदार मोहनमाला, अरुण पवार साहेब आदिवासी प्रकल्प अधिकारी, व सर्व सरकारी अधिकारी उपस्थित होते
टळली गैरसोय
कार्यक्रमाला सुमारे पाच ते सहा हजार आदिवासी बांधव उपस्थित होते. यावल रावेर चोपडा जळगाव जिल्ह्यामधील सर्व आदिवासी समाज बांधव उपस्थित होते त्यांची भोजनाची व्यवस्था प्रकल्प कार्यालयाने केली. यावेळी दुपारी साडेतीन वाजता पावसाने हजेरी लावली. पण, वॉटरप्रूफ मंडपाने गैरसोय टळली.
तंट्यामामांच्या वंशजांचा सन्मान
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण आदिवासी क्रांतीकारी तंट्यामामा भिल यांचे वंशज ठरले. पाचव्या पिढीचे वंशज दर्यावजी भिल, सहाव्या पिढीचे वंशज सुनील भिल हे खरगोन येथून आले होते. त्यांचा सन्मान आमदार अमोल जावळे , महाराष्ट्र ऑल इंडिया काँग्रेस सरचिटणीस धनंजय दादा चौधरी, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नाझीरकर, एम.बी. तडवी,सर, एकता मंच समिती व उत्सव समिती, व आसेम परिवार,व सर्व समाज बांधव आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रकल्पाधिकारी अरुण पवार साहेब यांनी केले.
ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट





