यावल तालुका विधी सेवा समितीच्या वतीने यावल तालुक्यातील कोरपावली येथील डी.एच.जैन विद्यालयात आज दिनांक 12 ऑगस्ट रोजी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 2012 अंतर्गत कायदेविषयक जनजागृती शिबिर घेण्यात आले. देशातील प्रत्येक बालकाचा निकोप शारीरिक आणि मानसिक विकास होणे गरजेचे आणि न्यायाचे असते, या अनुषंगाने हे शिबिर घेण्यात आले.
यावल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा प्रथम वर्ग न्यायाधीश आर. एस. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आज कोरपावली, तालुका यावल येथील डी.एच.जैन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी कायदे विषयक जनजागृती शिबिर घेण्यात आले. या अंतर्गत मुलांना ‘पोक्सो’ कायद्याची तोंड ओळख करून देऊन त्यांना ‘गुड टच आणि बॅड टच’ विषयी प्रबोधन करण्यात आले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशान्वये यावल तालुका विधी सेवा समिती विविध कायदेविषयक जनजागृती शिबिरांचे आयोजन करत असते. या अंतर्गत आज कोरपावली येथे ‘बाल लैंगिक अत्याचार अधिनियम 2012’ विषय विद्यार्थ्यांना माहिती देऊन त्यांना चांगल्या आणि वाईट हेतूने केल्या जाणाऱ्या स्पर्श विषयी सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले. लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये 90% घटना ह्या ओळखीतल्या व्यक्तींकडून होत असतात. अशा घटनांमध्ये पीडित व्यक्तींचे नातेवाईक, शेजारी किंवा ओळखीचे लोक सामील असतात. त्यामुळे बाल मनाला त्यांना ओळखणे अधिक कठीण होत असते. अशावेळी चांगले आणि वाईट स्पर्श कसे ओळखावे याबद्दल लहान मुलांमध्ये संभ्रमाची अवस्था असते. त्यामुळे त्यांना याबाबतीत सखोल मार्गदर्शन आवश्यक ठरते. या उद्देशानेच हा कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख होते शशिकांत वारूळकर हे होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुकलाल बोंदर नेहेते हे होते. तर उद्घाटक कोरपावली गावचे पोलीस पाटील सलीम रमजान तडवी हे होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. ई. पाटील सर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार विद्यालयाच्या मुख्याध्यापिका चारुशीला विनायक नेहेते यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे चेअरमन राकेश वसंत फेगडे आणि यावल न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक संजीव तडवी समांतर विधी सहाय्यक हेमंत फेगडे,अजय बढे तसेच विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट





