जळगाव जिल्हा प्रतिनिधी:
बशीर तडवी,
नायगाव गावातील आदिवासी तडवी भिल्ल समाजातील सौ. नुर विनोद/बि.राज तडवी यांनी किनगाव–नायगाव पंचायत समिती गटातून आगामी पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
सौ. नुर तडवी यांनी सांगितले की, त्यांचा मुख्य उद्देश गावकऱ्यांच्या मूलभूत अपेक्षा पूर्ण करणे आणि शेतकरी बांधवांसाठी सतत सहकार्य करणे हा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांना रेशनकार्ड, जात प्रमाणपत्र, आयुष्मान कार्ड, श्रम कार्ड यांसारख्या आवश्यक कागदपत्रांच्या सेवा घरपोच उपलब्ध करून दिल्या जाईल. तसेच, वाड्या व पाड्यांवर आधारकार्ड कॅम्पचे आयोजन, गरीब व गरजू नागरिकांसाठी शासकीय योजना पोहोचविणे आणि विविध सामाजिक व आरोग्यकॅम्पांचे आयोजन या बाबींवर विशेष लक्ष दिले जाईल.
सौ. नुर तडवी यांच्या पती बि.राज तडवी हे आसेमचे जिल्हाअध्यक्ष आणि आसेम महाऑनलाइन सेंटरचे व्यवस्थापक आहेत. समाजसेवेत त्यांच्या अनुभवाचे मार्गदर्शन सौ. नुर तडवी यांना मिळणार आहे, जे त्यांच्या सामाजिक कार्यात आणि पंचायत समितीतील नेतृत्वात महत्त्वाचे ठरेल.
याव्यतिरिक्त, नायगाव आणि किनगाव गटातील नागरिकांनी सौ. नुर तडवी यांच्या उमेदवारीसाठी सकारात्मक प्रतिसाद व्यक्त केला असून, स्थानिक समाजातील विविध वर्गातील नागरिकांनी त्यांना सर्वसमावेशक सेवा आणि सहकार्य देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. किनगाव गटातील मतदारांनीही त्यांच्या निवडणुकीसाठी पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
सौ. नुर तडवी यांनी सांगितले की, पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांनी गावकऱ्यांच्या समस्यांवर लक्ष देत, शेतकरी, महिला, युवा आणि गरीब नागरिकांसाठी कार्यरत राहणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असेल. त्यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक न्याय, पारदर्शकता, आणि गावकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले जाईल.सोबत ही मुद्देवारी सर्व परिसरात चर्चे चा विषय ठरली असून परिसरात त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतांना दिसत आहे…




