म. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव
विषय यावल ता पंचायत समिती अंतर्गत :-ग्रामपंचायत दुसखेडा ता. यावल येथील सन 2025/2026 या ) कालावधीतील १५ वा वित्त आयोग कामाची सखोल चौकशी करणे बाबत.. महोदय, वरील विषयास अनुसरून विनंती की, ग्रामपंचायत दुसखेडा ता. यावल येथील १५ वा वित्त आयोग अंतर्गत पाणीपुरवठा बाबींवर रुपये 252000/-व हळकुंड रु. 45000/- शौचालय साठी पाण्याची व्यवस्था करणे यावर रु 47979/-गटार ढापे यावर 158989/-असा एकूण 503968/-इतका खर्च ग्रामपंचायत अधिकारी श्री. प्रवीण कोळी यांनी दिनांक18/6/2025 रोजी आपली डी. एस. सी. वापरून खर्च केलेला आहे. वास्तविक श्री. प्रवीण कोळी यांना गटविकास अधिकारी पंचायत समिती यावल यांनी मे महिन्याच्या अखेरीस कार्यमुक्त केले आहे. व सदर ग्रामपंचायत अधिकारी बदलीने भुसावळ पंचायत समितीला जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हजर झाले आहे.पंचायत समिती यावल येथून कार्यमुक्त झाल्यानंतर कोळी यांना अधिकार नसतानाही त्यांनी 18जून रोजी 15वा वित्त आयोग निधीतून पेमेंट केल्याचे दिसून येत आहे. कार्यमुक्त होऊनही एखादा कर्मचारी आर्थिक व्यवहार करू शकतो का? कार्यरत असतांना खर्च का केला नाही?झालेला व्यवहार हा संशयास्पद वाटतो.याबाबत आपण उच्चस्तरीय समिती नेमून
सखोल चौकशी करावी. संबंधित ग्रामपंचायत अधिकारी यांनी अधिकाराचा दुरुपयोग केला असल्यास नियमानुसार त्यांचे विरुद्ध प्रशासकीय कारवाई करावी
ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट