बोदवड तालुक्यात ऑल इंडिया पॅंथर सेना जिल्हा बैठक पार पडली
जळगाव जिल्हा प्रतिनिधी
, बशिर तडवी,
बोदवड : तालुक्यात ऑल इंडिया पॅंथर सेना जिल्हा बैठक जिल्हाध्यक्ष (पूर्व) लखन पानपाटील व जिल्हाध्यक्ष (पश्चिम) रोहन मेढे तसेच जिल्हा पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या बैठकीत भीम भिमस्टार संघटनेचे अध्यक्ष दीपक इंगळे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोदवड तालुक्यातील पॅंथर सेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, शेकडो कार्यकर्त्यांनी पँथर सेनेत प्रवेश केला.
बैठकीत पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी महामानवांच्या विचारधारेवर मार्गदर्शन केले. “ऑल इंडिया पॅंथर सेना ही जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पोहोचली पाहिजे व गोरगरिबांच्या न्यायासाठी लढा दिला पाहिजे,” असे ते म्हणाले. संघर्ष नायक दीपक भाई केदार यांच्या चरवडीच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचे जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.
या प्रसंगी उपस्थितांनी विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यावर न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली.
ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट





