यावल तालुका प्रतिनिधी,बशिर तडवी,
जळगाव:- अंजनविहिरे.ता भडगाव येथील ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच श्री चिंधा धोंडू बाविस्कर यांनी शासकीय परवानगीशिवाय सरकारी जागेवर अतिक्रमण करून घरकुल बांधकाम केल्यामुळे त्यांना जिल्हाधिकारी जळगाव श्री आयुष प्रसाद यांनी सरपंच पदावरून अपात्र
ठरविलेले होते.मात्र
सादर निर्णया विरुद्ध सरपंच यांनी नासिक येथील अप्पर आयुक्त यांचे कोर्टात अपील केले असता त्यावर सुनावणी होऊन सरपंच यांनी स्वतःहून सरकारी गुरचरन जागेवर अतिक्रमण करून घरकुल बांधकाम केलेले नसून. शासनाने सदरची जागा घरकुलां साठी दिलेली आहे व त्या जागेवर घरकुल बांधकाम केलेले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी जळगाव यांन चा अपात्रतेचा निर्णय रद्द ठरविण्यात येवून श्री चिंधा धोंडू बाविस्कर यांना सरपंच पदी पात्र ठरविले आहे. सदरचा महत्त्वपूर्ण निर्णय नासिक येथील अप्पर आयुक्त श्री. अजय मोरे यांनी दिनांक 20.8.2025 रोजी दिला आहे. या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की अंजनविहिरे येथील गावठाण हद्दीतील
गट नंबर 218 ही जागा मिळकत गुरचरन साठी राखीव असल्यामुळे सदर जागेवर घरकुल बांधकाम केल्याची तक्रार पराभूत उमेदवार श्री मुकुंद बाविस्कर यांनी जिल्हाधिकारी यांना दिली होती. मात्र सरपंच चिंधI बाविस्कर यांना सन 2018 मध्ये शासनाने 300 चौरस फूट एवढी सरकारी जागा घरकुल बांधकाम करणे साठी दिली होती. मात्र सरपंच यांनी 268 चौ फुट ईतक्याच जागेवर घरकुल बांधकाम केले आहे. थोडक्यात नियमानुसार घरकुल बांधकाम केले असल्याचे भूमिअभिलेख विभाग भडगाव यांचे मोजणीत दिसून आले आहे. त्यामुळे सरपंच श्री बाविस्कर यांनी ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (जे३) च्या तरतुदींचा भंग केलेला नाही.म्हणुन जिल्हाधिकारी जळगाव
यांचा दिनांक 30.12.2024 रोजीचा अपात्रतेचा निर्णय रद्द ठरवुन सरपंच श्री बाविस्कर यांचे अपील मंजूर करून,अप्पर आयुक्त श्री अजय मोरे,यांनी सरपंच श्री चिंधा धोंडू बाविस्कर यांना लोकनियुक्त सरपंच म्हणुन पात्र ठरविले आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे लोकनियुक्त सरपंच श्री चिंधा धोंडू बाविस्कर यांचे तर्फे अँड. विश्वासराव आर भोसले (पिंपरखेडकर) यांनी काम पाहिले. या निकालामुळे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.
ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट