Monday, October 27, 2025
13 C
London

रानभाज्या खा… निरोगी राहा…पालकमंत्री गुलाबरावजी पाटील

जळगाव : जळगाव शहरातील मायादेवी नगर या ठिकाणी महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा जळगाव, कृषी विज्ञान केंद्र जळगाव/ पाल आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात शहरातील नागरिकांसाठी रानभाज्या आणि त्यापासून बनवलेले विविध पदार्थ उपलब्ध करून देण्यात आले होते.

होत्सवातील प्रमुख मुद्दे
👉 उद्घाटन: महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. त्यांनी दैनंदिन जीवनातील धावपळीमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी रानभाज्यांचा आहारात समावेश करण्याचे आवाहन केले.  जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद यांनी यावेळी प्रत्येक स्टॉलला भेटी देऊन रानभाज्याचे आहारातील महत्त्व लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन व कृषी विभाग यांच्या पुढाकारातून तालुकास्तरावर रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात येत असून या ठिकाणी शेतकरी, शेतकरी गट व महिला बचत गट यांना देखील स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे प्रतिपादन यावेळी केले.
तसेच आयोजकांमार्फत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी आपल्या आहारातील रानभाज्यांचे महत्त्व तसेच जळगाव पिकांची विविधता लक्षात घेऊन जळगाव जिल्हा हा समृद्ध जिल्हा असून या ठिकाणी पारंपारिक रानभाज्या ते निर्यात होणारी केळी असा परिपूर्ण असलेला जिल्हा असून आहारात रानभाज्यांचा समावेश करून निरोगी आयुष्य जगण्यासाठी रानभाज्याचे आहारातील महत्त्व यावेळी सांगितले
👉 उपलब्धता: महोत्सवात जळगाव जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट आणि महिला बचत गटांनी ८० स्टॉल्स लावले होते. या स्टॉल्समध्ये पारंपरिक पद्धतीने पिकवलेल्या रानभाज्या आणि त्यांच्यापासून बनवलेले खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.
👉 पाककला स्पर्धा: कार्यक्रमात पाककला स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये विशेषता सुकेळी, अंबाडी चहा,गोकर्ण चहा, मशरूम सूप, मिल्की मशरूम, ओले अंजीर या सारखे विविध पदार्थ शहरातील ग्राहकांसाठी यावेळी विक्री करता उपलब्ध करून देण्यात आले.
👉आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन: यावल तालुक्यातील आदिवासी बांधवांनी पारंपरिक नृत्य आणि वाद्यांची कला सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
👉मान्यवरांची उपस्थिती: या कार्यक्रमाला विधानसभा सदस्य आ. राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टचे अध्यक्ष गौरव सपळे, प्रकल्प प्रमुख योगेश भोळे, सचिव देवेश कोठारी, महेश सोनी यांच्यासह अनेक अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👉 झालेली विक्री : सकाळी १०.०० वाजेपासून सुरू झालेल्या महोत्सव दुपारी १.०० वाजेपर्यंत अंदाजे रु.९५,०००/- इतकी झाली.

या महोत्सवाद्वारे रानभाज्यांचे महत्त्व आणि त्यांचे आरोग्यदायी फायदे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सदरील कार्यक्रमावेळी सूत्रसंचालन नोडल अधिकारी, स्मार्ट श्रीकांत झांबरे यांनी केले व आभार प्रकल्प उपसंचालक भरत इंगळे यांनी मानले.

ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट

 

Hot this week

फतेहपुर सीकरी, आगरा: दबंगों के विवाद में पुलिस पर भी सवाल, फरियादी का आरोप

झूठे केस में फंसाने का दावा, न्यायालय में पहुंचा...

रावेर तालुका व शहर काँग्रेसची आढावा बैठक उत्साहात पार

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – बशीर तडवी रावेर (ता. रावेर) :...

नहर में मिला बबीना निवासी इलेक्ट्रिशियन का शव, पहचान होते ही मचा कोहराम

चकरपुर नहर पुल के नीचे मिला शव, पैर फिसलने...

Topics

फतेहपुर सीकरी, आगरा: दबंगों के विवाद में पुलिस पर भी सवाल, फरियादी का आरोप

झूठे केस में फंसाने का दावा, न्यायालय में पहुंचा...

रावेर तालुका व शहर काँग्रेसची आढावा बैठक उत्साहात पार

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – बशीर तडवी रावेर (ता. रावेर) :...

बबीना का कारगिल पार्क फिर से खिला, छावनी परिषद ने लौटाई रौनक

बबीना (झांसी)। बबीना का एकमात्र कारगिल पार्क, जो छावनी...

दिल्ली-से सिलीगुड़ी जा रही ट्रेन में से अचानक गायब हुए पिताजी: शोध जारी

चापगढ़ (मैनागुड़ी), जलपाईगुड़ी से रिपोर्ट — ग्राम चापगढ़, थाना...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img