महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून लाभार्थींना भांडी वाटप कार्यक्रमाचा यावलमध्ये सलग तिसऱ्यांदा फज्ञ्जा उडाला. संकेतस्थळ बंद असल्याचे सांगत भांडी वितरण करणाऱ्या व्यक्ती यावलमध्ये आल्याच नाहीत. परिणामी बाजार समितीत एकत्र आलेल्या लाभार्थीनी पुन्हा रास्ता रोकोचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी वाद घालणाऱ्या काहींनी पोलिसांनी ताब्यात घेत नंतर सुटका केली.
यावल तालुक्यात २५ ऑगस्टला लाभार्थीना भांडी वाटप निश्चित होते. त्यासाठी सर्वांना शहरातील बाजार समितीच्या गोदामात बोलावले होते. मात्र, संकेतस्थळ बंद पडल्याने पहिल्या दिवशी ५०० पैकी फक्त १५ लाभार्थींना भांडी मिळाली. इतरांना २६ ऑगस्टला बोलावण्यात आले. पण, पुन्हा संकेतस्थळ बंद असल्याचे समोर आले. यावेळी संतप्त लाभार्थीनी दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. यानंतर प्रशासनाने भांडी वितरणासाठी २८ ऑगस्ट ही तारीख दिली होती. त्यानुसार अनेक गवंडी तथा बांधकाम कामगार
भांडी न मिळाल्याने लाभार्थीनी पुन्हा रास्ता रोकोचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तो प्रयत्न हाणून पाडला.
प्रशासनाकडून कोणीही फिरकले नाही
लाभार्थींना भांडी घेण्यासाठी बोलावले. पण, संकेतस्थळ बंद असल्याचे सांगून वितरण व्यवस्थेतील कोणीही यावलला आले नाही. लाभार्थी उशिरापर्यंत थांबलेले असताना सुद्धा भांडी कधी मिळतील? संकेतस्थळ कधी सुरू होईल? याची स्पष्टता प्रशासनाकडून झाली नाही. यामुळे लाभार्थीच्या संतापात आणखी भर पडली. त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली.
सकाळपासून गोदाम परिसरात एकत्र आले. पण, दुपारी १ वाजेपर्यंत सुद्धा कोणीही फिरकले नाही. यामुळे महिला-पुरुष लाभार्थीनी अंकलेश्वर
आम्ही भिकारी नाही, फिरवाफिरव थांबवा
लाभार्थींनी संतप्त भावना बोलून दाखवल्या. आम्ही भिकारी नाहीत. रोज रोजगार बुडवून भांडी घेण्यासाठी बोलावले जाते. पण, तासनतास थांबूनही उपयोग होत नाही असे सांगितले. हा मनस्ताप दूर करावा, असे सांगितले. आंदोलनाच्या तयारीत असलेल्या काहींना पोलिसांनी ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले. नंतर सुटका केली.
बऱ्हाणपूर महामार्ग अडवण्यासाठी भुसावळ टी पॉइंट गाठले. ही माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना रोखले. आपण
रावेरमध्येही यावलचा कित्ता गिरवला
केवळ यावल नव्हे रावेर तालुक्यात सुद्धा योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे. हरितालिकेच्या दिवशी ५०० लाभार्थींना भांडी घेण्यासाठी बोलावण्यात आले. त्यानुसार लाभार्थी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात भांडे संच घेण्यासाठी जमले आले. पण, तांत्रिक कारण पुढे करत त्यांनाही संच मिळाले नाहीत. यामुळे महिलांनी घोषणाबाजी केली.
आंदोलन करू नये. निवेदन द्यावे असे सांगत समजूत काढली. यानंतर लाभार्थीनी तहसील कार्यालय व पंचायत समितीत निवेदन दिले.
ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट