जळगाव जिल्हा (प्रतिनिधी) बशिर तडवी—जामनेर तालुक्यातील वाकोद येथे किरकोळ वादातून एका तरुणाने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकबर वजीर तडवी (वय 29, व्यवसाय मजुरी, रा. वाकोद, ता. जामनेर, जि. जळगाव) या तरुणाने 7 ऑक्टोबर 2025 रोजी विषप्राशन केले. तात्काळ त्याला वैद्यकीय उपचारासाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना 9 ऑक्टोबर रोजी त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणात प्राथमिक माहितीनुसार, विषप्राशनपूर्वी त्याला काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी किरकोळ कारणावरून मारहाण केल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. पोलिस स्टेशनला पीडित कुटुंब गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे.
अकबर तडवी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मातापिता, आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून शोककळा पसरली आहे. हा प्रश्न गांभीर्याने उपस्थीत करत स्थानिक प्रशासनासमोर दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
घटना स्थळ: वाकोद, ता.
ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट





