जळगाव जिल्हा प्रतिनिधी – बशीर तडवी
रावेर (ता. रावेर) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रावेर तालुका व रावेर शहर काँग्रेस समित्यांची आढावा बैठक कृषी उत्पन्न बाजार समिती येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी प्रचंड उत्साह, एकजूट आणि आत्मविश्वास दाखवून दिला असून काँग्रेस पक्षात नवचैतन्य संचारले आहे.
बैठकीचे मार्गदर्शन व निरीक्षण मा. डॉ. अरविंद कोलते (महासचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व प्रभारी – रावेर–यावल मतदारसंघ) यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले,
“मतदारांचा भावनिक विश्वास हेच काँग्रेसचे खरं सामर्थ्य आहे. आता हा विश्वास विजयात रूपांतरित करण्याची वेळ आली आहे. जनतेची निष्ठा आणि प्रेम हेच प्रत्येक कार्यकर्त्याचे प्रेरणास्थान असावे.”
बैठकीदरम्यान विविध जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका मतदारसंघांतील राजकीय स्थिती, संभाव्य उमेदवार आणि विजयाच्या शक्यता यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेत हे अधोरेखित झाले की काही स्थानिक नेते पक्षापासून दूर गेले असले तरी मतदार आजही काँग्रेसच्या विचारधारेवर ठाम श्रद्धा ठेवून आहेत, हे पक्षाचे सर्वात मोठे बलस्थान असल्याचे सर्वांनी मान्य केले. सर्वांचे लाडके नेते धनंजय दादा चौधरी.
रावेर तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मा. डॉ. राजेंद्र पाटील, जिल्हा आदिवासी सेलचे अध्यक्ष मा. संजय जमादार, शहराध्यक्ष मा. धुमा तायडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व नेते उपस्थित होते. उपस्थितांमध्ये मा. देविदास हडपे, मा. हमीद शेठ, मा. हरिष गनवाणी, मा. विनायक महाजन, मा. नरेंद्र पाटील, मा. जिजाबराव महाजन, मा. उस्मान तडवी, मा. गुणवंत टोंगळे, मा. लियाकत जमादार, मा. काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ता दिलरुबाब तडवी. आदींचा समावेश होता.
कार्यकर्त्यांच्या घोषणांचा गजर आणि उत्साह पाहता रावेर काँग्रेस पुन्हा एकदा रणांगणात उतरण्यास सज्ज झाली आहे. ही लढाई केवळ निवडणुकीची नसून, ती जनतेच्या विश्वासाची आणि काँग्रेसच्या पुनरुत्थानाची लढाई असल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.
जळगाव जिल्हा प्रतिनिधी बशिर तडवी इंडिया आज ई खबर रिपोर्टर





