जळगाव जिल्हा प्रतिनिधी
बशिर तडवी,
पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्साहवर्धक घडामोडीत, मा. आदित्य विकास गजरे यांची ‘दैनिक हॅलो बातमीदार’ या वृत्तपत्रात रावेर तालुका प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.या नियुक्तीचे आदेश मुख्य संपादक सुमेध सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. या प्रसंगी संपादकांनी त्यांना नियुक्तीपत्र देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मिठाईचा बॉक्स देऊन अभिनंदनही केले.आदित्य गजरे यांनी या विश्वासाबद्दल संपादकांचे आभार मानले असून, “रावेर तालुक्यातील जनतेच्या समस्या, घडामोडी व सामाजिक विषय निर्भीडपणे लोकांसमोर आणण्यासाठी मी कटिबद्ध राहीन,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
या नियुक्तीबद्दल त्यांचे विविध सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार व सहकारी पत्रकारांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
जळगाव जिल्हा प्रतिनिधी बशिर तडवी इंडिया आज ई खबर रिपोर्टर





