Sunday, October 26, 2025
4.6 C
London

“लव मोहम्मद ” लिखाणामुळे कारवाई होत असल्याने पोलिसांसह शासनाला लेखी निवेदन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी,

बशिर तडवी,

यावल दि.२४ ( सध्या देशातील विविध ठिकाणी वेगवेगळ्या भागात “I LOVE MOHAMMAD” असे लिहिल्यामुळे नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याचे प्रकार समोर येत आहे. अलीकडे कानपूर (उत्तरप्रदेश) येथे २५ जणांवर तर ग्रोधा (गुजरात) येथे ८८ जणांवर फक्त “I LOVE MOHAMMAD” लिहिल्यामुळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या शिवाय इतर ठिकाणी अश्या प्रकारची कारवाई आपल्या स्वतंत्र व संविधानिक देशात सुरू आहे. असे यावल तहसीलदार, यावल पोलीस निरीक्षक, महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात यावल समस्त मुस्लिम समाज बांधवांतर्फे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. “I LOVE MOHAMMAD” हा वाक्यप्रचार कोणत्याही प्रकारे असभ्य आक्षेपार्ह किंवा असंवैधानिक नाही. हा फक्त धार्मिक प्रेम व आदर व्यक्त करण्याचा मार्ग आहे आणि वारा वफात सण ईद-ए-मिलाद साजरा करतांना त्या वेळेस होडिंग वॅनर लावले होते. भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्मा वद्दल प्रेम, आदर व्यक्त करण्याच्या तसेच स्वतंत्रपणे आपल्या विचार मांडण्याचे सोवत आपला धर्म, मजहव, जातीचे विचार जोपसण्याचे

अभिस्वातंत्र्य व हक्क दिला आहे. कलम १९ (१) (२) च्या आधारावर प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी देते. कलम २५ प्रत्येक नागरिकाला आपआपले धर्माचे पालन आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य देते. कलम २१ नागरिकांना जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार देते. मी मुहम्मदवर प्रेम करतो” हा कोणत्याही धर्माचा अपमान नाही, तर प्रेम आणि श्रद्धेचा एक सकारात्मक संकेत आहे. या आधारावर खटला दाखल करणे म्हणजे लोकशाही आणि संविधानाच्या आत्म्यावर हल्ला करणे सारखे आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या निष्णकारण कारवाया थांवविण्यासाठी तसेच समाजातील सामाजिक सौदार्य व शांतता

टिकविण्यासाठी शासन पातळीवर योग्य पाऊले उचलून पोलिस प्रशासनाने यावावत संवेदनशीलतेने निर्णय घेणे अत्यंत आवश्यक असल्याने आपण याबाबतीत योग्य ती पुढील सकारात्मक कार्यवाही करावी अशा मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक यावल यांना देताना समस्त मुस्लिम समाज बांधवांतर्फे अशफ़ाक शाह, शोएव खान, असलम शैख, जफर शौख, अफजल खान, समीर पटेल, इमरान पटेल, नफीस खान, जुनेद खान, अरशद खान, युनुस शैख, वसीम पटेल, राजा खान, शफीउल्ला खान, यूसुफ मास्टर,] K टेलर, नासिर शैख, खालिद पिंजरी अजहर खटीक, आसिफ कुरेशी, हाजी फारूकसह यावल मुस्लिम बांधव हजर होते.

ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट

Hot this week

औरंगाबाद विधानसभा क्षेत्र से प्रत्याशी कांग्रेस आनंद शंकर

औरंगाबाद विधानसभा क्षेत्र से प्रत्याशी कांग्रेस आनंद शंकर आनंद...

Topics

औरंगाबाद विधानसभा क्षेत्र से प्रत्याशी कांग्रेस आनंद शंकर

औरंगाबाद विधानसभा क्षेत्र से प्रत्याशी कांग्रेस आनंद शंकर आनंद...

रूपेश कुमार की संघर्ष से सफलता तक की कहानी

सोशल मीडिया के माध्यम से रूपेश छूना चाहते हैं...

वाराणसी से लापता किशोर! परिवार बेहाल, तलाश में जुटी पुलिस

वाराणसी। लोहता थाना क्षेत्र के रामरायपुर अकेलवा गांव से...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img