Sunday, August 3, 2025
20.3 C
London

भालोद येथे विद्यार्थी सुरक्षा समितीने आयोजित केले कायदेविषयक जनजागृती शिबिर

यावल तालुका प्रतिनिधी,

बशिर तडवी,

यावल तालुक्यातील भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थी सुरक्षा समितीचे प्रमुख एस.आर.झांबरे सर यांच्या विनंतीवरून आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.व्ही.चौधरी यांच्या सूचनेप्रमाणे,आज दिनांक 23 जुलै वार बुधवारी यावल तालुका विधी सेवा समिती च्या माध्यमातून या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध कायदेविषयक प्रबोधन शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावल तालुका विधी सेवा समिती, समितीचे अध्यक्ष तथा प्रथम वर्ग न्यायाधीश आर.एस.जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण तालुक्यात विविध कायदेविषयक जनजागृती शिबिर आयोजित करण्यात येत असतात. सदर समिती जेष्ठ नागरिक, आदिवासी बांधव, महिला आणि बालक, दिव्यांग बांधवांसाठी, रस्ते आणि वाहतुकीच्या नियमांसंदर्भात तसेच विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम आणि कायदेविषयक प्रबोधन शिबिरे घेत असते. या कार्यक्रमांची प्रेरणा घेऊन भालोदच्या न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थी सुरक्षा समितीचे प्रमुख एस.आर.झांबरे यांनी तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधून आपल्या विद्यालयात कार्यक्रम घेण्याविषयी विनंती केली, त्या अनुषंगाने आज हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध कायद्यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. बालकांसाठी सक्तीचे शिक्षण कायदा, बाल हक्क संरक्षण कायदा 2005, बालविवाह प्रतिबंधक कायदा, बाल कामगार प्रतिबंधक कायदा, बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 अशा विविध कायद्यांसह विद्यार्थ्यांना ‘उपचारांपेक्षा प्रतिबंध चांगला’ या हेतूने प्रबोधन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते शशिकांत वारूळकर हे होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शाळेचे मुख्याध्यापक डी. व्ही. चौधरी हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.एस.सुरवाडे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावल न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक संजीव तडवी, समांतर विधी सहाय्यक अजय बढे आणि हेमंत फेगडे तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक आर.एस.जवळे तथा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट

Hot this week

एंकर: कालाहांडी जिले के जूनागढ़ थाना के अंतर्गत माहीभर गाँव में शुक्रवार को एक दुखत घटना घटी ।

स्थान :-धर्मगढ़ कालाहांडी, ओडिशा स्लगन:- फावड़े की वार से छोटे...

खुशबू कुमारी: दो बच्चियों की मां ने परिवार का भार उठाने के लिए थामा ई-रिक्शा का हैंडल

मधेपुरा जिले के मुरलीगंज थाना क्षेत्र अंतर्गत प्रखंड की...

Topics

खुशबू कुमारी: दो बच्चियों की मां ने परिवार का भार उठाने के लिए थामा ई-रिक्शा का हैंडल

मधेपुरा जिले के मुरलीगंज थाना क्षेत्र अंतर्गत प्रखंड की...

चोरी की वारदात: आईसीयू में था बच्चा, पीछे से खाली हुआ घर – 26 लाख का सोना और 5 लाख नकद ले उड़े चोर

नई दिल्ली/कालिंदी कुंज: राजधानी दिल्ली के दक्षिण-पूर्वी जिले में चोरी...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img