*नूतन विद्या मंदिर, अंजाळे येथे शिक्षक-पालक सभा संपन्न !*
जळगाव जिल्हा प्रतिनिधी,
बशिर तडवी,
यावल : १ ऑक्टोंबर २०२५
अंजाळे येथील नूतन विद्या मंदिर शाळेत शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न झाली. उत्तम नागरिक घडविण्यासाठी शिक्षणाबरोबरच सशक्त संस्कार विद्यार्थ्यांवर झाले पाहिजेत, यावर सर्वांनी भर दिला. त्यासाठी शाळेसोबतच पालकांनी आपली जबाबदारी समजून घेतली पाहिजे, असे आवाहन करण्यात आले.
सभेमध्ये शाळेतील विविध उपक्रम, विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक सवयी जोपासण्याचे महत्त्व, तसेच शैक्षणिक प्रगतीसाठी पालकांचा सहभाग या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाची पूर्तता व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळेत जादा तासिका घेण्यात येत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या तासिकेमध्ये वाचन, लेखन गणितीय क्रिया सोबतच मागील धडे पुनरावलोकन, प्रश्नोत्तर सराव आणि परीक्षेची तयारी यावर विशेष भर दिला जात आहे.
कार्यक्रमाला मुख्याध्यापिका सौ. नीलिमा झोपे, वरिष्ठ शिक्षक डी. व्ही. बोरोले सर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. लिलाधर वानखेडे सर यांनी केले.




