तालुक्यातील विरावली दहिगाव रोडवर एक धक्कादायक घटना घडली असून, दोन जणांनी मिळून एका तरुणाची हत्या केल्याची घटना घडली असुन हत्या करणारे हत्या करून मोटरसायकलसह यावलच्या पोलीस स्टेशन मध्ये स्वतः हजर झाले आहे. मयत तरुणाचे नाव इम्रान युनुस पटेल (वय २१ वर्ष असुन, राहणार सुरेश आबा नगर दहिगाव तालुका यावल) असून हत्या झाल्याचे ठिकाण विरावली दहिगाव रोडवरील खिरवा रस्त्यावर झाली असल्याचे वृत्त आहे. इम्रान पटेल हा खून झालेला तरूण मुळ हनुमंतखेडा तालुका धरणगाव येथील राहणारा असुन तो दहिगाव येथे आपल्या मामाच्या गावी राहात होता.
दरम्यान, हत्या करणारे दोघे संशयित आरोपी तरुणांची नावे ज्ञानेश्वर गजानन पाटील (वय १९) व गजानन रविद्र कोळी (वय १९) असून हे दोघे तरुण यावल पोलीस स्टेशनला दुचाकी द्वारे हजर झाले. अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी अनिल बडगुजर,पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे साहेब, एपीआय वाढवे साहेब, पीएसआय अनिल महाजन साहेब, पीएसआय मकसूदशेख साहेब पीएसआय सुनील मोरे,स फौ, विजय पाचपोडे. वासुदेव मराठे हवालदार राजेंद्र पवार, सागर कोळी, निलेश चौधरी, सुनील पाटील, वसीम तडवी,अमित तडवी,मोहन तायडे, पुरुषोत्तम पाटील, मुकेश पाटील, मुकेश घुगे, मंगेश पाटील, परमेश्वर जाधव, बागुल, अनिल साळुंखे,,घटनास्थळी पथकासह दाखल झाले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास वरील अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अनिल महाजन करीत आहे
ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट