यावल तालुका प्रतिनिधी,
बशिर तडवी,
दिनांक 31/08/2025 रोजी 21:30 वाजेच्या सुमारास वनपाल फैजपूर यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरुन फैजपूर राऊंड स्टाफ व वन कर्मचाऱ्यांसह मौजे वनोली शिवार ता. यावल येथे जाऊन वनोली शिवारात दबा धरून बसले असता एक बंधूकीच्या फायरिंगचा आवाज आला, आवाज येताच आवाजाच्या दिशेने पळत जाऊन शोध घेतला असता दोन इसम संदीग्ध अवस्थेत दिसून आले व त्यांना सापळा रचून जागीच रांगेहाथ पकडले. त्यांनीच फायर केल्याचे आरोपींनी कबुल केले. आरोपी जवळ एक बंदूक (एअर रायफल), दोन चाकू, टॉर्च व एक मोटर सायकल असे शिकारी साठी लागणारे साहित्य व एका पोत्यात 5 मृत मोर मिळून आले. सदर 5 मृत मोर व शिकारीचे साहित्यासह दोनही आरोपी नामे 1) सलीम रुबाब तडवी 2) सय्यद अफसर अली मुशताक अली रा. मारूळ ता. यावल यांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी यावल येथे आणले. गुन्हेकामी वनरक्षक बोरखेडा बु. यांनी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 2(16),2(20),2(36),9, 39 व 48अ अन्वये प्र. रि. क्र. 05/2025 दि.01/09/2025 अन्वये वनगुन्हा नोंदविला.
आज दिनांक 01/09/2025 रोजी दुपारी आरोपीस म. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, यावल यांचे न्यायलायात हजर केले असता दोनही आरोपींना 03 दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली.
सदरील कारवाई मा. वनसंरक्षक धुळे वनवृत्त, श्रीमती निनू सोमराज मॅडम, मा. उप वनसंरक्षक, यावल वनविभाग, जळगाव श्री.जमीर शेख सर, मा. विभागीय वनाधिकारी (दक्षता)धुळे श्री. राजेंद्र सदगीर सर, मा. सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा), यावल श्री.समाधान पाटील सर, मा. वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पूर्व श्री.स्वप्नील फटांगरे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कार्यवाही दरम्यान वनपाल फैजपूर व रेंज स्टाफ हजर होते. सदर गुन्ह्याचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पूर्व करीत आहेत.