यावल | यावल पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक अमित तडवीयांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. फैजपूर येथील डीवायएसपी कार्यालय अंतर्गत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलिस अंमलदारांचे कौतुक व्हावे. पोलिसांनी काम चांगले करावे, यासाठी पोलिस स्टेशन ‘टॉप कॉप ऑफ द मंथ’ ही संकल्पना राबवण्यात येत आहे. यात कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र आणि एक हजार रुपयांचे बक्षीस दिले जाते. याबद्दल पोलिस नाईक अमित तडवी यांचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे आदींनी कौतुक केले आहे.
ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट