यावल तालुक्यातील डोंगर कोठारा. शिवारामध्ये काही दिवसापूर्वी मादी आणि बिबट्या त्याचे पिल्लू शेतकऱ्यांना दिसले होते त्यापैकी सुमारे साडेतीन महिने एक पिल्लू रविवारी गायरान शिवारातील एका केळीच्या बागेत मृता अवस्थेत आढळले. ही माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने मृत बेबी त्याला ताब्यात घेतले. सोमवारी त्याचे शवविच्छेदन केले जाणार आहे. डोंगरकठोरा शिवारात बिबट्याचा वावर आहे. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना मादी बिबट तिच्या पिल्लांसोबत दिसली होती. मात्र रविवारी सायंकाळी गायरान भागातील ग्रामपंचायतीच्या शेतीत एक पिलू मृतअवस्थेत आढळले. केळी बागेत हा प्रकार नजरेस पडताच शेतकऱ्याने वनविभागाला माहिती दिली. यानंतर यावल प्रादेशिक वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील पटांगरे, वनपाल तडवी पथकासह शेतात दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृत पिल्लू ताब्यात घेतले.
ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट